Heatwave Agrowon
हवामान

Weather Update Maharashtra : राज्यात उन्हाचा चटका वाढला; अनेक ठिकाणी पारा ३५ अंशावर 

Weather Forecast: आज निरभ्र आकाशसह किमान आणि कमाल तापमानात वाढ कायम राहण्याच अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Dhananjay Sanap

Pune News: राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा पार चढू लागला आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. तर उकाड्याने घमाटा निघत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशाच्या वर गेला आहे. आज निरभ्र आकाशसह किमान आणि कमाल तापमानात वाढ कायम राहण्याच अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात विदर्भाचा पारा चढू लागला आहे. मागील चोवीस तासात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील निचांकी १४.६ अंश सेल्सियस तापमानात नोंद नाशिक येथे झाली. राज्यात मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.

तसेच पुढील ३ ते ४ दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता असून पुढील २४ तासात किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील ४८ तासात राज्यात आकाश निरभ्र राहून अनेक ठिकाणी कमाल तापमान ३६ अंशावर आणि किमान २२ अंशावर पोहचण्याची शक्यता आहे.

ईशान्य आसाम आणि लगतच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती अअसून त्यामुळे अरुणाचल आणि ईशान्य आसाममध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर ऊंचीवर पश्चिमी चक्रावात निर्माण झाला आहे. त्यामुळे ८ ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान दक्षिण हिमालय भागात पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता आहे.

देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील फतेहपुर येथे निचांकी २.१ अंश सेल्सियसची नोंद झाली. राज्यात मात्र पहाटेचा गारवा कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पुढील २४ तासात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT