Maharashtra Temperature Rise: तापमानातील वाढ कायम राहणार

Maharashtra Weather Forecast: राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांवर पोहोचला असून, उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत आहे.
Temperature
TemperatureAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांवर पोहोचला असून, उन्हाचा चटका, उकाडा तापदायक ठरत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ७) कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १२५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. गुरुवारी (ता. ५) राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. किमान तापमान १४ ते २१ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. गुरुवारी (ता. ५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Temperature
Maharashtra Temperature Alert: उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

राज्यात थंडी कमी होत असतानाच, कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरीसह सोलापूर, जेऊर, परभणी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ येथे तापमान ३५ अंशांपार आहे. राज्यात उन्हाचा चटक्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. ७) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज कायम आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३२.८---१४.७

अहिल्यानगर---३३.२---१५.३

धुळे---३०---११

जळगाव---३१.२---१६.८

जेऊर---३५---१५

Temperature
Maharashtra Heatwave Alert: उन्हाचा पारा ३७ अंशावर; कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

कोल्हापूर---३३.४---१९.३

महाबळेश्वर---२८.९---१६.९

मालेगाव---३२.८---१६

नाशिक---३१.१---१४.७

निफाड---३०---१२.५

सांगली---३३.९---१७.७

सातारा---३३.६---१६

सोलापूर---३६.०---२०.४

सांताक्रूझ---३२.८---१७.६

डहाणू---२८.१---१६.४

रत्नागिरी---३१.६---१८.८

छत्रपती संभाजीनगर---३२---१६.४

धाराशिव---निरंक---१७.४

परभणी---३५.२---१७.२

परभणी (कृषी)---३३.९---१५

अकोला---३४.९---१७.६

अमरावती---३५.४---१७.५

भंडारा---३४.४---१८

बुलडाणा---३१.३---१७

ब्रह्मपुरी---३७.२---१८.८

चंद्रपूर---३५.६---निरंक

गडचिरोली---३५.२---१७.६

गोंदिया---३४.८---१९.४

नागपूर---३४.७---१९.४

वर्धा---३५.५---१९

वाशीम---३४.४---२०.६

यवतमाळ---३५---१८.२

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३७.२, सोलापूर ३६, चंद्रपूर ३५.६, वर्धा ३५.५, अमरावती ३५.४, परभणी ३५.२, गडचिरोली ३५.२, जेऊर ३५, यवतमाळ ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com