Weather Forecast: मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर खानदेशात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत बहुतांश भागांत केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, कुठेही अतिवृष्टीची नोंद झालेली नाही. जुलैअखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी भिज पाऊस, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला, तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात तुलनेने कमी पावसाची नोंद झाली..Weather Update: खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण.जूनमधील तूट जुलैने भरून काढलीजून महिन्यात जळगाव जिल्ह्यात ४२ टक्के कमी पाऊस झाला होता. विशेषतः रावेर परिसरात पावसाची तूट जाणवत होती. मात्र जुलैतील चांगल्या पावसामुळे ही तूट भरून निघाली. नंदुरबार जिल्ह्यातही जुलैच्या सुरुवातीला पावसाचा खंड होता. त्यानंतर झालेल्या संततधार पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली..Weather Update: खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण.जून ते सप्टेंबर या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे सरासरी पाऊसमान ६३२ मिलिमीटर असून, आतापर्यंत सुमारे २५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्याचे सरासरी पाऊसमान ५४५ मिलिमीटर असून, त्यापैकी सुमारे ४० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे सरासरी पाऊसमान ८३२ मिलिमीटर असून, त्यापैकी सुमारे ३० टक्के पाऊस झाला आहे..जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी १२३ मिलिमीटर, तर जुलैमध्ये १८९ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असते. यंदा जुलैमध्ये २०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे..अधूनमधून तुरळक सरीगेल्या दोन-तीन दिवसांत खानदेशात कुठेही जोरदार पाऊस झाला नसला, तरी जळगाव, धरणगाव, चोपडा आणि यावल परिसरात दुपारनंतर किंवा सायंकाळी अधूनमधून तुरळक सरी पडत आहेत. ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.