Weather Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील तापमानात चढ उतार सुरूच; देशातील काही भागात पावसाची शक्यता

Weather Forecast : राज्यात मागील आठवड्यापासून तापमानातील चढ उतार सुरूच आहेत.

Dhananjay Sanap

Pune News : पहाटे आणि संध्याकाळी गारठा जाणवू लागला आहे. तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. राज्यात मागील आठवड्यापासून तापमानातील चढ उतार सुरूच आहेत.

हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत: कोरड्या हवामानसह तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

उत्तरेतील काही भागात तापमानात चढ उतार सुरू आहे. मागील चोवीस तासात देशातील बहुतांश भागात किमान तापमान घट झाली नाही. केवळ पूर्व मध्य प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, पुददूचेरी, केरळा आणि कराईकल भागात तुरळक ठिकाणी १ ते २ अंश सेल्सियसनं किमान तापमानात घट नोंदवली गेली. तर विदर्भ, राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगड भागात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसनं वाढ झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. 

दक्षिण बंगालच्या उपसागरावर मध्यभागी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे केरळातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर देशातील काही भागात पुढील सात दिवसात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मात्र पुढील पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर राजयंत मागील चोवीस तासात जळगावमध्ये नीचांकी १५.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सध्या शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीला वेग आला आहे. काही भागात सोयाबीनची खळी सुरू आहेत. तसेच कापूस वेचणी आणि नवीन लागवडीतील ऊस खुरपणीची कामेही शेतकरी करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT