Maharashtra Winter Agrowon
हवामान

Maharashtra Winter : तापमानात चढ-उतार सुरूच; थंडीची चाहूल

Weather Update : राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.९ अंश तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात उद्यापर्यंत (ता. १०) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. मनारच्या आखातापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

कोकणात उन्हाचा चटका अधिक असला, तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा कमी होत आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझसह डहाणू, रत्नागिरी येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे.

तसेच निफाडसह नाशिक, महाबळेश्‍वर, परभणी (कृषी विद्यापीठ), अहिल्यानगर, जळगाव येथे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आले आहे. आज (ता. ९) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९ (१६.२), अहिल्यानगर ३१.९ (१५.७), जळगाव ३४ (१५.७), कोल्हापूर ३१ (१९.२), महाबळेश्‍वर २६.८ (१५.२), मालेगाव ३१.२ (१७.२), नाशिक ३१.७ (१४.६), निफाड ३१.४ (१३.९), सांगली ३२.३ (१८.५), सातारा ३२ (१७), सोलापूर ३४.४ (२१.४), सांताक्रूझ ३६ (२२), डहाणू ३५.३ (२०.८),

रत्नागिरी ३५.५ (२३), छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१६.६), नांदेड (१८), धाराशिव ३२ (१७.४), परभणी ३२.१ (१८.१), अकोला ३४.१ (१९.२), अमरावती ३३.४ (१९.२), बुलडाणा ३१.४ (१८.४), ब्रह्मपुरी ३३.० (१८.३), चंद्रपूर ३२.४ (१७.८), गडचिरोली ३२.२ (१८), गोंदिया ३१.८ (१७.४), नागपूर ३२ (१७.८), वर्धा ३२.१ (१९.५), वाशीम ३४.८, यवतमाळ ३३ (१८.५).

१६ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : निफाड १३.९, नाशिक १४.६, महाबळेश्‍वर १५.२, परभणी (कृषी विद्यापीठ) १५.३, अहिल्यानगर १५.७, जळगाव १५.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT