Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: तापमानात चढ उतार राहण्याचा अंदाज; राज्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात होतेय वाढ

IMD Forecast: महाराष्ट्रातील थंडी कमी होत असून किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील अनेक भागांत दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हवामान विभागाने तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: कोकणात तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे. आजही अनेक भागात उष्ण आणि दमट हवामान होते. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३८.४ अंश तापमानाची नोंद झाली. तर देशात सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमान केरळमधील कन्नूर येथे होते. आजपासून राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी होऊन कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. आज हरियानातील नहान येथे देशातील सर्वात कमी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हणजेच उत्तर भारतातील किमान तापमानात वाढ होत आहे.

तसेच कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. आज केरळमधी कन्नूर येथे सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. देशाच्या अनेक भागात तापमान ३७ अंसाच्या पुढे गेले आहे.

राज्यातही किमान तापमानात वाढ झाली आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी १३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर कमाल तापानाचा पारा अनेक ठिकाणी ३६ अंशाच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. डहाणू, जळगाव, मालेगाव, सांताक्रुझ, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तापमानाने ३६ अंशाचा पातळी पार केली होती. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT