Heat Agrowon
हवामान

Maharashtra Heat : मालेगावातील तापमान ४०.८ अंशावर; राज्यातील सरासरी तापमानात चांगलीच वाढ

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली. मालेगाव येथे मागील २४ तासांमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर तापमानातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यात पावसाळी वातावरण निवळल्यानंतर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली. काही भागात सध्या सकाळी काहीशी थंडी जाणवत असली तरी सरासरी तापमान जास् आहे. राज्यातील बहुतांशी भागात कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकला आहे.

तर गेल्या २४ तासांमध्ये दोन ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर सोलापूर येथे ४० अंश सेल्सिअस तापमान होते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. 

राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशाच्या पुढे गेले. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर चांगलाच घामटाही निघत आहे. राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाची ताप चांगलीच वाढू शकते. राज्यात सरासरी तापमानातील वाढ काम राहू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Farmers Protest: ऊस दरावरुन 'स्वाभिमानी'चं 'काटा बंद' आंदोलन सुरु, राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली कराडमधील कृष्णा कारखान्यावर धडक

Water Scarcity Plan : संभाव्य पाणीटंचाईचा गावनिहाय आराखडा तयार करा

Loan Waiver List : बीडमधील ४५ हजार शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत समावेश

Hoopoe Birds: बेलपाडा मैदानावर ‘हुपू’चे आगमन

Gram Rojgar Sahayak: ग्राम रोजगार सहायकांना सहा महिन्यांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT