Winter  Agrowon
हवामान

Maharashtra Weather News : राज्याच्या तापमानात होतोय चढ-उतार

Maharashtra Cold Update : राज्यात गारठा वाढू लागताच, कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढू लागली आहे.

अमोल कुटे

Pune Weather Update : राज्यात गारठा वाढू लागताच, कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढू लागली आहे. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात'ऑक्टोबर हीट'चा चटका कमी झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुपारचे तापमान ३३ अंशाच्या खाली आले आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३५ अंशाच्या खाली आले आहे.

किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली आहे.

पहाटे गारठा जाणवू लागला असून, किमान तापमानात हळूहळू घट होऊन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (१४.५), जळगाव ३४.४ (११.६), कोल्हापूर ३१.९ (१९.४), महाबळेश्वर २७.१ (१६.१), नाशिक ३२.३ (१४.८), निफाड ३२.८ (१३.५), सांगली ३३.१ (१८.८), सातारा ३३.० (१६.०), सोलापूर ३६.० (१८.०),

सांताक्रूझ ३६.४ (२१.५), डहाणू ३४.१ (२१.०), रत्नागिरी ३६.४(२१.६), छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१३.६), नांदेड ३२.८ (१७.६), परभणी ३३.४ (१६.६), अकोला ३४.७ (१७.०), अमरावती ३२.६ (१६.३), बुलढाणा ३२.५ (१६.७), ब्रह्मपूरी ३४.७ (१८.०), चंद्रपूर ३१.६(१६.०), गडचिरोली ३१.४ (१६.२), गोंदिया ३२.१(१६.२), नागपूर ३२.२ (१६.२), वर्धा ३२.१(१६.८), वाशीम ३४.४(१५.०) यवतमाळ ३४.० (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

SCROLL FOR NEXT