Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा ताप अन् उकाडा वाढला

Summer Season : दोन तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

अमोल कुटे

Pune News : दोन तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यात उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ झाली आहे. किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने गारठा कमी होत आहे. आज (ता. ९) राज्यात उन्हाची ताप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या हवामानात वेगाने बदल असल्याने कधी उन्हाचा चटका, कधी गारठा, तर कधी अवकाळी पाऊस, गारपिट अशा हवामान घटनांना सामोरे जावे लागत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असल्याने, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. यातच उकाडा वाढल्याने घामटा निघत आहे.

शुक्रवारी (ता. ८) किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकला असून, सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या वरच आहे.

उत्तर ओडिशा ते आंध्र प्रदेश किनारपट्टी पर्यंत तसेच, तेलंगणा ते कोमोरिन भागापर्यंत हवेचे कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता.९) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.२ (१५.५), धुळे ३४.५ (११.०), जळगाव ३४.७ (१४.९), कोल्हापूर ३५.१ (१९.७), महाबळेश्वर ३०.५ (१७.४), मालेगाव ३५.६ (१६.८), नाशिक ३४.२ (१४.९), निफाड ३३.१ (१०.२), सांगली ३६.४ (१७.६), सातारा ३५.७ (१७.६), सोलापूर ३८.६ (१९.६), सांताक्रूझ ३३.५ (१९.५), डहाणू २९.२ (२०.६), रत्नागिरी ३२.५ (१९.७),

छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१८.५), नांदेड ३६.६ (१८.८), परभणी ३७.२ (१९.३), अकोला ३६.७ (१७.५), अमरावती ३५.४ (१७.७), बुलढाणा ३३.६ (१८.८), ब्रह्मपूरी ३६.३ (२०.६) चंद्रपूर ३७.६ (१९.०), गडचिरोली ३५.४ (१९.४), गोंदिया ३३.२ (१८.०), नागपूर ३५.० (१८.२), वर्धा ३७.० (१९.४), वाशीम ३७.६ (१७.२), यवतमाळ ३८.२ (१७.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT