Weather Change : किमान तापमानात खानदेशात घट

Khandesh weather : खानदेशात मागील दोन दिवसांत किमान तापमानात घट झाली असून, निरभ्र व कोरडे वातावरण आहे.
Weather
Weather Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन दिवसांत किमान तापमानात घट झाली असून, निरभ्र व कोरडे वातावरण आहे. यामुळे शेतीकामांनाही गती आली आहे. ममुराबाद (ता. जळगाव) येथील तेलबिया संशोधन केंद्रअंतर्गत कार्यरत हवामान विभागात मंगळवारी (ता. ५) कमाल तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.

किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत मध्यंतरी पोहोचले होते. परंतु त्यात मागील दोन दिवसांत घट झाली आहे. बुधवारीदेखील (ता. ६) किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस होते. मागील वर्षी ४ ते ६ मार्च या दरम्यान खानदेशात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवर होते. परंतु यंदा मात्र किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.

Weather
Hawaman Andaj : पुढील पाच दिवस तापमान कसे राहील? उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज

खानदेशात २६ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान अनेक भागात गारपीट, वादळी पाऊस झाला. या कालावधीत ढगाळ वातावरण होते. दुपारी घामाच्या धारा लागायच्या. या कालावधीत शेतीकामेही ठप्प झाली होती. परंतु ३ मार्चपासून किंवा मागील रविवारी (ता. ३) वातावरण निवरले. सोमवारी (ता. ४) बऱ्यापैकी निरभ्र वातावरण होते. यामुळे सोमवारीच किमान व कमाल तापमानात घट झाली. यामुळे शेतीकामेही गावोगावी वेगात सुरू झाली.

कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस एवढे मागील दोन दिवस राहिले आहे. दुपारी १२ ते ३ यादरम्यान उन्हाचा चटकाही जाणवत आहे. परंतु चारनंतर वातावरणात गारवा तयार होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शेतीकामे सकाळी १० ते दुपारी ५ यादरम्यान सुरू आहे. पुढे जशी उष्णता वाढेल, तशी शेतीकामे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होतील, असे सांगण्यात आले.

Weather
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय

सध्या खानदेशात दादर ज्वारी, हरभरा, मका कापणी व मळणीची कामे सुरू आहेत. तसेच केळी, पपई लागवड, आंतरमशागत, तणनियंत्रण आदी कामांनाही गती आली आहे. कलिंगड, केळी व पपईची काढणी मध्यंतरी गारपीट व वादळी पावसाने रखडली होती. ही काढणीदेखील सध्या वेगात सुरू आहे.

थंडी वाढल्याने केळी, कलिंगड या पिकांना रात्रीच्या वेळेस खते देण्यासह सिंचनाचे काम शेतकरी करून घेत आहेत. थंडीमुळे एक ते सव्वा महिन्याच्या बागांत चिलींग इंज्युरीची समस्या तयार झाली आहे. यामुळे शेतकरी पिकात विविध खते, कीडनाशकांची आळवणी करून घेत आहेत. रात्री शेतात जाण्यासाठी ऊबदार कपड्यांचा आधारही सध्या घ्यावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com