Rain Forecast Agowon
हवामान

Weather Forecast : राज्यात आज वादळी पाऊस पडण्याचा अंदाज

Latest Rain Forecast : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस सुरू असतानाच, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस सुरू असतानाच, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १२) विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात विजा मेघगर्जनेसह, वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सातत्याने ४३ अंशाच्या पार पोचला आहे. पारा ४० अंशांच्या पुढे असल्याने, तसेच कमाल तापमानात ४.५ अंशांपेक्षा वाढ झाल्याने अमरावती येथे उष्णतेची लाट आली आहे.

अकोला, बुलडाणा, गोंदिया, यवतमाळ येथेही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पारा ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान होता.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परभणीतील गंगाखेड येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू राहणार असून, मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. आज (ता. १२) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.८ (२४.७), जळगाव ४२.० (२७.६), धुळे ४१.० (२३.६), कोल्हापूर ३३.५ (२४.१), महाबळेश्वर २४.१ (१८.०), नाशिक ३७.७ (२५.७),

निफाड ३८.४ (२४.२), सांगली ३४.० (२४.६), सातारा ३५.३ (२३.८), सोलापूर ३९.५ (२५.०), सांताक्रूझ ३८.५ (२९.२), डहाणू ३९.२ (२९.१), रत्नागिरी ३६.४ (२५.१),

छत्रपती संभाजीनगर ३९.४ (२०.८), नांदेड ४०.८ (२५.६), परभणी ४१.२ (२३.६), अकोला ४२.८ (२८.४), अमरावती ४२.०(२४.१), बुलडाणा ४०.२ (२६.८), ब्रह्मपुरी ४२.८ (२८.८),

चंद्रपूर ४२.६(२७.०), गडचिरोली ४२.२ (२८.२), गोंदिया ४३.४ (२५.४), नागपूर ४२.७ (२८.४), वर्धा -(२८.८), वाशीम ४१.६(२५.७) यवतमाळ ४१.७ (२५.५).

पावसाचा अंदाज असलेली ठिकाणे

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

गोंदिया ४३.४, अकोला ४२.८, ब्रह्मपुरी ४२.८, नागपूर ४२.७, चंद्रपूर ४२.६, गडचिरोली ४२.२, जळगाव ४२, अमरावती ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT