Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा ३६ अंशांच्याही पुढे गेला आहे. यातच दुपारनंतर वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस कोसळत आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी (ता. २) वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येण्याची चिन्हे असून, दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे. राज्याचे तापमान वाढल्याने सकाळपासूनच उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पहाटेच्या धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. सकाळपासून उकाडा वाढत असून, दुपारनंतर वळीव पावसाचे ढग दाटून येत वादळी पाऊस हजेरी लावत आहे.

गुरुवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा येथे तापमान ३६ अंशांवर गेले असून, नागपूर, परभणी, सोलापूर, गडचिरोली, यवतमाळ येथे तापमानाचा पारा पस्तिशीपार आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह जोरदार सरींची शक्यता आहे.

विजांसह पावसाचा अंदाज

पुणे, सातारा, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदलेले कमाल तापमान : पुणे ३३.८, जळगाव ३५.२, कोल्हापूर ३२.३, महाबळेश्वर २६.१, मालेगाव ३१.८, नाशिक ३२.८, निफाड २९.५, सांगली ३३.६, सातारा ३३.१, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३३.५, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३२.४, छत्रपती संभाजीनगर ३३.६, बीड ३३.०, धाराशिव ३३.०, परभणी ३५.३, अकोला ३६.६, अमरावती ३४.२, भंडारा ३२.०, बुलडाणा ३२.६, ब्रह्मपुरी ३६.०, चंद्रपूर ३६.२, गडचिरोली ३५.०, गोंदिया ३४.५, नागपूर ३५.९, वर्धा ३६.०, वाशीम ३४.०, यवतमाळ ३५.०.

उपसागरात आज कमी दाबाचे संकेत

आग्नेय बांगलादेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे आज (ता. ४) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

अकोला ३६.६, चंद्रपूर ३६.२, ब्रह्मपुरी ३६, वर्धा ३६, नागपूर ३५.९, परभणी ३५.३, सोलापूर ३५.२, गडचिरोली ३५, यवतमाळ ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT