Summer Weather Agrowon
हवामान

Hawaman Update: कमाल तापमानात काहीशी घट; राज्यातील किमान तापमानात बहुतांशी भागात चांगली वाढ

Maharashtra Weather Update: राज्यातील कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी बहुतांश भागात किमान तापमान वाढले आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे तापमानाचा चढ-उतार सुरूच आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील कमाल तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. अनेक भागात किमान तापमान आता २० अंशाच्या दरम्यान पोचले. तर कमाल तापमानाने ३६ अंशाची पातळी ओलांडली. केवळ राज्यातच नाही तर उत्तर भारतातही उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.  

उत्तर भारतातील किमान तापमानातील वाढ कायम आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. आज पंजाबमधील अमृतसर थेथे देशातील सर्वता कमी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर देशातील सर्वाधिक कमाल तापमानाचीन नोंद केरळमधील कन्नूर येथे झाली.

कन्नूर येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमान होते. नोंद पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

राज्यातील काही ठिकाणी काहीसे ढगाळ हवामानही होते. त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतार दिसत आहेत. तर कोकणातील उष्ण आणि दमट हवामानाची लाटही काहीशी कमी झाली. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात तीन दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

राज्यातील सर्वात कमी १४.४ अंश सेल्सिअस तापमान निफाड येथील गहू संशोधन केंद्रात होते. तर राज्यातील सर्वाधिक तापमान मालेगाव येथे ३७.६ अंश सेल्सिअस होते. राज्यातील तापमानत चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT