Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर कधीपासून ? माॅन्सूनचा प्रवास कशामुळे थबकला? आठवड्याचा पावसाचा अंदाज काय?

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनची सध्याची स्थिती, पावसाची स्थिती आणि पुढील अंदाज याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्टीकरण दिले. माॅन्सूनची जून महिन्यातील वाटचाल दरवर्षी रखडते फक्त यंदा ठिकाण बदलले. तसेच पुढील आठवड्यानंतर राज्यात पाऊस दिसू शकतो, असे श्री खुळे यांनी सांगितले. 

राज्यात चांगला पाऊस कधीपासून पडू शकतो? 

मजबूत अरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर  उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आस, च्या अस्तित्वामुळे मुळे १८ ते २५ जूनपर्यंत आठवडाभर, मुंबईशहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

हा माॅन्सूनचा जोर पाहता, येत्या पाच दिवसानंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पूरक प्रणाल्या तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माॅन्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे. तर माॅन्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाच्छायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते.

त्यामुळे वरील वातावरणाच्या एकत्रित परिणामातून, पौर्णिमेनंतर म्हणजे २३ जूनपासून माॅन्सूनची सक्रियता वाढून मुंबईसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार तर खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाला सुरवात होऊ शकते, असे वाटते, असे श्री खुळे यांनी सांगितले.

जूनमध्येच माॅन्सून का थबकला? 

श्री. खुळे म्हणाले की, दरवर्षी माॅन्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जुन महिन्यातील कमकुवतपणा ह्यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट माॅन्सूनी वारे वाहत आहेत.

ह्या व्यतिरिक्त माॅन्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते, असे खुळे यांनी स्पष्ट केले. 

मान्सूनच्या आतापर्यंतच्या १९ दिवसाच्या वाटचालीत ह्यावर्षी काही वेगळी विसंगती दिसते का? 
दरवर्षी, मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर जून मध्यावर सहसा कमकुवत होवून कर्नाटकातच मुक्काम ठोकत असतो.

पण ह्यावर्षी मात्र त्याने फक्त जागा बदलून काहीसे पुढे येऊन महाराष्ट्रात मुक्काम ठोकला एव्हढाच काय तो फरक! पण मात्र, एखाद्या दोन दिवसाच्या फरकाव्यतिरिक्त माॅन्सून त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे त्याच्या वाटचालीत बरोबर आहे. हेही लक्षात असू द्यावे. फक्त बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र चांगलीच रेंगाळली आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा का? 

मागील ५ दिवस पावसाचा जोर कमी होणार म्हटल्यावर महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या विवेकावर पेरणीवर झडप घातली. पण अश्या पेर केलेल्या व बाठर ओलीवर पेर केलेल्या व अजूनही पेर करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी माॅन्सूनच्या ह्या मंद वाटचालीच्या घटनेकडे सुद्धा आवर्जून व गांभीर्याने बघावे. कारण लवकरच मान्सून जर सक्रिय होणार असेल तर खात्रीच्या पूर्ण ओलीवर पेरणीचा शेतकऱ्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT