Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला

Monsoon Rain : आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामान होत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने उसंत घेतली आहे.

पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेले असून, रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील भंडारा येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूर आणि गोंदिया येथे पारा ४१ अंशांपार आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Rain Update
Weekly Weather : बुधवारपासून चांगल्या पावसाचा अंदाज
Rain Update
Monsoon Update : मॉन्सूनची चाल मंदावली

मॉन्सून जैसे थे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. बुधवारी (ता. १२) विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची चाल मंदावली असून, रविवारी (ता. १६) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही. खानदेश, पूर्व विदर्भात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे.

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

देवगड ५०, सुधागडपाली, वेंगुर्ला प्रत्येकी ४०, मालवण, रामेश्वर, संगमेश्वर, रोहा प्रत्येकी ३०, महाड, मंडणगड, राजापूर, खालापूर, रत्नागिरी, गुहागर प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र :

पाडेगाव ४०, ओझरखेडा, भडगाव ३०, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, शिरपूर, फलटण, सिन्नर, वणी, सोलापूर प्रत्येकी १०.

मराठवाडा :

माजलगाव, उदगीर प्रत्येकी २०, जिंतूर, भोकरदन, माहूर, धारूर प्रत्येकी १०.

विदर्भ :

लोणार २०, जेवती, वाशीम, घाटंजी, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, सालकेसा प्रत्येकी १०.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धारशिव, लातूर, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार सरींचा अंदाज :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com