Monsoon Agrowon
हवामान

Retreat Monsoon : उत्तर भारतातून मॉन्सूनची माघार

Monsoon Update : महाराष्ट्रातील परतीची मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. शुक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Team Agrowon

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील परतीची मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. शुक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थबकली. २ ऑक्टोबर रोजी तब्बल आठ दिवसांनी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर शनिवारी (ता. ५) मॉन्सूनने उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून मुक्काम हलवला.

त्यानंतर मात्र मॉन्सूनची परतीची वाटचाल पुन्हा थांबली. शुक्रवारी (ता. ११) संपूर्ण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. दरभंगा, हजारीबाग, पेंद्रा रोड, नरसिंगपूर, खारगाव, नंदुरबार, नवासरीपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान होत असल्याने दोन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या उर्वरित भागासह, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीमच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कमी दाब क्षेत्र होतंय तीव्र

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकून महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. ही प्रणाली वायव्येकडे जाताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT