Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात 'रेड अलर्ट'

Rain Forecast : बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. १९) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'रेड' अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली दोन दिवसांत आणखी तीव्र होऊन ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, मंडला, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे.

गुरूवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे सर्वाधिक १९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात देखील अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. धरण पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा प्रतीक्षा कायम आहे.

आज (ता. १९) कोकणातील रत्नागिरी, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, वर्धा, नागपूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT