Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १५७ मंडलांत पावसाच्या सरी

Rain News : आषाढीच्या मुहूर्तावर बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १५७ मंडलांत पावसाची हजेरी लागली.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : आषाढीच्या मुहूर्तावर बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १५७ मंडलांत पावसाची हजेरी लागली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५७, जालन्यातील ३९ व बीडमधील ६१ मंडलांचा समावेश आहे. बहुतांश मंडलात हलकी, तर काही मंडलांत मध्यम ते दमदार स्वरूपाची पावसाची हजेरी होती. तीनही जिल्ह्यांतील सात मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ५७ मंडलांमध्ये पाऊस झाला. ज्या २६ मंडलांमध्ये पाऊस झाला नाही, त्यामध्ये सोयगाव, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मंडलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तीन मंडळालांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३९ मंडलांत पावसाची हजेरी लागली.

Rain Update
Pune Rain Update : धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला

हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार स्वरूपाची ही हजेरी होती. जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दोन मंडळांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व मंडलांमध्ये तुरळक, हलका, मध्यम, दमदार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

Rain Update
Kerala Rain Update : केरळच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर १६.५, चौका ४५.५, शेंदूरवादा २०, हरसुल ५१, शिऊर ५२.३, बोरसर २५.८, लोणी खुर्द १६.५, लासूर ४३.८, जानेफळ ५१, वेरूळ ३२.५, बाजार सावंगी ३६.८, सावलदबारा १३, फुलंब्री १३.३.

जालना

भोकरदन २१.५, सिपोरा १२.५, हसनाबाद ११, माहोरा १२.५, कुंभारझरी २१.२, वाघरूळ १९, सातोना ५५.८, शेळगाव १०.३, दाभाडी १६.५, बावणे पांगरी १९.५, मंठा १४.८.

बीड

म्हाळसजवळा ३१.३, नाळवंडी १२.८, पिंपळनेर २५.५, बीड ११.५, पेंडगाव २२.३, मादळमोही १४.८, पाचेगाव १५.५, सिरसदेवी २६.८, माजलगाव ४४.८, नित्रुड ४८.३, दिंद्रूड ५१, पाटोदा (म) ११, लोखंडी सावरगाव १३.५, घाटनांदूर ३५, बर्दापूर १७.३, केज १०.८, विडा १०.८, बनसारोळा १०.८, परळी १८.८, धर्मापुरी ५१.४, नागापूर २७.५ धारूर ४२.८ मोहखेड २८ तेलगाव २८ वडवणी ४०.४.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले, (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

डोणगाव ८७

गारज ८०.५

देवगाव रंगारी ७६.३

जालना

राजूर ७७.३

केदारखेडा ७७.३

बीड

सिरसाळा ६५.८

पिंपळगाव गाढे ७३.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com