Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्यामुळे आकाश ढगाळ होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्यामुळे आकाश ढगाळ होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ५) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, गुरुवारी (ता. ४) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागांत किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान होते. तर पंजाब हरियाना, राजस्थानमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. गुरुवारी (ता. ४) निफाड येथील गहू संशोधन केंद्र व गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ५) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे.

आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून उत्तर प्रदेशपर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. ५) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१५.९), धुळे ३० (१३.६), जळगाव २९.३ (१६.९), कोल्हापूर २९.५ (१९.७), महाबळेश्वर २५.९ (१५.५), नाशिक २८.९ (१५.९), निफाड २८.८ (१३.५), सांगली २९.६ (१९.९), सातारा ३०.३ (१६.५), सोलापूर ३२ (१९), सांताक्रूझ ३०.९ (१९), डहाणू २६.३ (१८.५), रत्नागिरी ३३.५ (२१.२),

छत्रपती संभाजीनगर २८.५ (१६.४), नांदेड २८.८ (१७.८), परभणी २९.६ (१६.४), अकोला ३०.१ (१७.५), अमरावती २८.८ (१७.१), बुलडाणा २८ (१७.५), ब्रह्मपुरी ३१.३ (१५.४), चंद्रपूर २८.६ (१५.२), गडचिरोली २७.४ (१४.८), गोंदिया २९ (१३.५), नागपूर २७.८ (१६.०), वर्धा २८ (१६), वाशीम २८.४ (१४.८), यवतमाळ ३०.४ (१७.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT