Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Rain Alert Maharashtra : राज्यात पावसाचा जोर कमीच आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. राज्यात पुढील ५ दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यात पावसाचा जोर कमीच आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. राज्यात पुढील ५ दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडतील. इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

उद्या पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडिचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे, मराठवड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT