Akola Rain: दोन महिन्यांत कुठे कमी, तर कुठे अधिक पाऊस

Akola Weather: यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यांत असमतोल पाऊस झाल्याचा परिणाम विविध तालुक्यांच्या नोंदीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. काही तालुक्यांनी सव्वा ते दीडपट सरासरी गाठली आहे.
Akola Rain
Akola RainAgrowon
Published on
Updated on

Akola News: यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यांत असमतोल पाऊस झाल्याचा परिणाम विविध तालुक्यांच्या नोंदीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. काही तालुक्यांनी सव्वा ते दीडपट सरासरी गाठली आहे. दुसरीकडे काही तालुक्यात अद्याप ७५ टक्केही पाऊस झालेला नाही. पाऊस झालेल्या भागातील प्रकल्प तुडूंब भरत आहेत. 

या हंगामात आजवर असमतोल पाऊस होत आलेला आहे. गेल्या तीन-चार दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने पिकांना दिलासा मिळालेला आहे. यामुळे पावसाची टक्केवारी वाढत चालली आहे. अकोला जिल्हयात बाळापूर, पातूर या दोन तालुक्यात ११० टक्के पाऊस झाला.

Akola Rain
Akola Rain fall: जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

येथे २८ जुलैपर्यंत २९८ आणि ३९८ इतका पाऊस पडतो. परंतु यंदा अनुक्रमे ३४१.८ आणि  ४५० मिलि पावसाची नोंद झालेली आहे. उर्वरित तालुक्यांत अकोट, बार्शीटाकळी हे १०० टक्क्यांपर्यंत पोचत आहेत. तर तेल्हारा, अकोला, मूर्तिजापूर हे तालुके पिछाडीवर पडले आहेत. 

बुलडाणा जिल्हयात लोणार तालुक्यात सरासरी तब्बल १६१ टक्के पाऊस झाला. येथे सरासरी ३५७ मिली असून प्रत्यक्षात ५७७.२ मिली पाऊस झाला. सिंदखेडराजात १२८.६ टक्के पाऊस नोंद झाली. मेहकरही १४२.५ टक्के आहे. देऊळगावराजात १३९.३ टक्के पाऊस नोंद झाला. चिखली तालुका १०० टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

Akola Rain
Akola Heavy Rain : अकोला, वाशीम जिल्ह्यांतील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी

उर्वरित तालुक्यांचा विचार केला तर संग्रामपूर यंदा सर्वाधिक पिछाडीवर पडलेला तालुका बनला आहे. येथे ६१.८ टक्के म्हणजेच सरासरी ३२५.८ मिलीच्या तुलनेत २०१.३ मिली एवढाच पाऊस झालेला आहे. या तालुक्यातील पातुर्डा मंडलात अवघा १५३.३ मिली पाऊस झालेला आहे.

सरासरी ३२५ च्या तुलनेत ४७.१ टक्के इतकाच पाऊस झाला. पावसाचे दोन महिने आता पुर्ण होत आलेले असतानाच ही स्थिती तयार झालेली आहे. जळगाव जामोद तालुक्यात ८७.९, बुलडाणा ८७.४, खामगाव ८२.५, शेगाव ८०.२, मलकापूर ८६.७, मोताळा ७८.३, नांदुरा ७१.२ टक्के एवढा पाऊस झालेला आहे. 

Akola Rain
Akola Rain News : अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाला सुरुवात

अकोल्यात मोठे प्रकल्प तुलनेने अधिक

अकोला जिल्हयातील काटेपूर्णा हा प्रकल्प आतापर्यंत ४४.७० टक्के भरला आहे. वान प्रकल्पसुद्धा ४४.४९ टक्के झाला आहे. काटेपूर्णात गेल्यावर्षी याच तारखेत ४१.९२ टक्के तर वानमध्ये २८.८४ टक्के पाणी साठा होता.  बुलडाणा जिल्हयातील पेनटाकळी हा प्रकल्प गतवर्षी (१३.८३ टक्के) च्या तुलनेत यंदा ७१.८२ टक्के भरला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातही मागीलवर्षी या काळात शुन्य टक्के साठा होता. यंदा ३७.९७ टक्के तर  नळगंगा प्रकल्पात गेल्यावर्षी ३०.१९ टक्केच्या तुलनेत ४५.६७ टक्के पाणी साठले आहे.

वाशीम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

वाशीम जिल्ह्यात सहा पैकी चार तालुक्यातील पावसाने टक्केवारीची शंभरी ओलांडलेली आहे. मालेगाव तालुक्यात सरासरी ३९३ मिलीच्या तुलनेत ५३१.६ म्हणजेच १३५.३ टक्के पाऊस झाला. रिसोडमध्ये १२४.९, मंगरुळपीर ११२.३, वाशीम १०१.१ टक्के पाऊस पडला.

तर कारंजामध्ये सर्वात कमी ८७.१ टक्के एवढाच पाऊस झाला.या ठिकाणी ३८२च्या तुलनेत ३३३.१ आणि मानोरा तालुक्यात सरारी ३५१.५ च्या तुलनेत ३३८.४ म्हणजेच ९६.३ टक्के पाऊस झाला.  या जिल्ह्यात रिसोड, मालेगाव तालुक्यात काही भागांत सततच्या पावसाने शेतीची मशागत रखडत चाललेली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com