Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पुढील चार दिवसही पावसाचे ; राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला

IMD alert : राज्यभरात हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. तसेच उद्यापासून पुढचे चार दिवसही राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

Swapnil Shinde

Weather update today : राज्याच्या अनेक भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती देखिल निर्माण झाली. राज्यभरात हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. तसेच उद्यापासून पुढचे चार दिवसही राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. 

राज्यभरात बहुतांशी ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. दुपारनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला होता. तर काही ठिकाणी पूर आल्याने पिकांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी पीकही वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुपारनंतर राज्यातील अनेक भागात पाऊस सुरुच होता, अशी माहिती मिळाली होती.

हवामान विभागाने उद्याही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला. उद्या संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड तसेच खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे आणि कोकणातील रागयड आणि ठाणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

सोमवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना तर जळगावसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि पुणे तसेच कोकणातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मंगळवारी आणि बुधवारीही राज्याच्या अनेक भागात जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT