Nagpur Flood : नागपुरात कोसळधारा ! अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस

Nagpur Rain : नागपुरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने शहरातील अनेक घरात पाणी शिरले आहे.
Nagpur Rain
Nagpur RainAgrowon
Published on
Updated on

Nagpur Heavy Rain : राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वच जण चातकासारखी वाट पाहत होते. अखेर गणेशोत्वसाच्या मुहूर्तावर अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मध्यरात्री नागपूरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागनदीला पूर आला आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील अनेक घरात पाणी शिरले आहे. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 टीमकडून बचाव कार्य सुरू आहे.

Nagpur Rain
Maharashtra Rain Forecast : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

सध्या पुन्हा एका मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बुलढाणा आदी जिल्ह्यांना झोडपले आहे. नागपूर आणि परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच नागलवाडी, मोरभावन बस स्टॅन्ड, सिताबर्डी, पंचशील चौक, अंबाझरी परिसरात पाणी साचले आहे. त्या ठिकाणी नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या वतीने बचाव कार्य सुरू आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत.

नागपुरात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. सध्या सर्वच भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com