Monsoon Rain Agrowon
हवामान

Rain Maharashtra : राज्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील पाच दिवसाचा अंदाज काय ?  

Weather Update : राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त विभागाने दिला.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. आज राज्यातील १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त विभागाने दिला.

तर कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तर पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील भंडारा, चंद्रपुर, गोंदिया, नागपूर  गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

तर उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडीप राहील. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. रविवारी रायगड, पुणे, भंडारा, गडचिरोली. गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक

Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT