Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज; मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

Rain Forecast : हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात ४ ते ५ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बहुतांशी भागात उघाडीप आहे. मात्र विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आजपासून पुढील ५ दिवस विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

पुढील ५ दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. आज धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर उद्या जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. शनिवारी बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर रविवारी परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. तसेच बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT