Maharashtra Rain : राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप

Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकणात कमीअधिक पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत रत्नागिरीमधील आंबवली सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मात्र, अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. तर मराठवाडा व विदर्भात अतिपावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे.

कोकणात ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील नयाहडी येथे ७८ मिलिमीटर, तर धसइ ५४, देहरी ५७, सरळगाव ५७ मिलिमीटर पाऊस झाला. रायगडमधील महाड, नाटे, तुडील येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला. तर रत्नागिरीतील मुरडव, माखजन येथे ९२ मिलिमीटर पाऊस झाला. तर सिंधुदुर्गमधील भेडशी येथे ४७ मिलिमीटर, पालघरमधील वाडा ४१, तलसरी ४४, झरी ५६ मिलिमीटर पाऊस झाला.

Maharashtra Rain
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ११ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित

घाटमाथ्यावर तुरळक सरी बरसत आहे. तर खानदेशात जळगावमधील मुक्ताईनगर येथे ३२ मिलिमीटर पाऊस झाला. तर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. यामध्ये लातूरमधील किल्लारी ४५ मिलिमीटर, तर कासार बालकुंड २०, आंबुलगा २४, मदनसुरी २३ मिलिमीटर, नांदेडमधील पिंपरखेड ४७, भोकर ५०, मोघाळी ३४, मातूळ ४१, किणी ४३, दहेली ५१, धर्माबाद ४०, सिरजखोड ४८ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Maharashtra Rain
Heavy Rain: उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

बुधवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : बिरवडी ४९, खारवली ४२, माणगाव ४०, इंदापूर, निजामपूर, ४६, गोरेगाव, लोणेरे ४८, चिपळूण, खेर्डी ४८, मार्गताम्हाणे ४५, वहाळ ५२, कळकवणे ६६, शिरगांव ५६, दापोली ९४, दाभोळ ४२, आंजर्ले ५२, वाकवली ४६, पालगड ७९, वेळवी ९४, खेड ४६, कुळवंडी ५९, भरणे ६५, धामणंद ४८, आबलोली ५२, मंडणगड ५३, कडवी ७४, फणसवणे ७४, आंगवली ६१, देवरुख ५१, तेर्ये ७४.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३६, टाकेद, दहादेवाडी ३०, कार्ला ४६, लोणावळा ५३, वेल्हा ६१, आंबेगाव ५७, बामणोली ४०, तापोळा ४३, लामज ७३, कोकरूड ३५, चरण ३४, मलकापूर ५२, आंबा ७२, साळवण ३९, कडगाव ४४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com