Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी कायम आहे. तुरळक ठिकाणी गारपीट देखील होत आहे. आज (ता. १३) विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुरुवारी (ता. ११) सायंकाळनंतर सोलापूर, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पाऊस पडला. तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात ढगाळ आकाश होत आहे. राज्याच्या कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.०, धुळे ३९.०, जळगाव ३५.३, कोल्हापूर ३८.५, महाबळेश्वर ३२.३, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.६, निफाड ३६.७, सांगली ३९.०, सातारा ३९.२, सोलापूर ३९.४, सांताक्रूझ ३३.६, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३३.७,

छत्रपती संभाजीनगर ३५.९, बीड ३४.२, नांदेड ३३.२, धाराशिव ३९.०, परभणी ३४.२, अकोला ३३.७, अमरावती ३०.८, बुलडाणा ३३.८, ब्रह्मपुरी २८.७, चंद्रपूर ३२.०, गडचिरोली २८.०, गोंदिया २८.८, नागपूर २५.८, वर्धा २९.०, वाशीम ३७.६, यवतमाळ ३१.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT