Weather Forecast : विदर्भात आज पुन्हा पाऊस, गारपिटीचा इशारा

Weather Update : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज
Hailstorm
HailstormAgrowon

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. जेऊर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. ११) विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील प्रणालीत मिसळून गेली आहे. बुधवारी (ता. १०) सायंकाळनंतर बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीने तडाखा दिला आहे.

Hailstorm
Weather Forecast : विदर्भात पाऊस, गारपिटीचा इशारा

विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मालेगाव येथे ४१.६ अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज (ता. ११) विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Hailstorm
Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस पावसाचा अंदाज ; सात जिल्ह्यांना गारपीटीचा तर ३ जिल्ह्यांना `रेड अलर्टचा` इशारा

बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.०, नगर ३८.८, धुळे ३९.०, जळगाव ३९.५, जेऊर ४३.०, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ४१.६, नाशिक ३७.७, निफाड ३६.९, सांगली ३९.९, सातारा ३९.२, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३३.६, छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ३८.३, नांदेड ३८.९, धाराशिव ३९.८, परभणी ३८.२, अकोला ३८.३, अमरावती ३५.८, बुलडाणा ३७.४, ब्रह्मपुरी ३६.०, चंद्रपूर ३६.२, गडचिरोली ३५.२, गोंदिया ३३.६, नागपूर ३४.५, वर्धा ३४.५, यवतमाळ ३७.७.

वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :
मालेगाव ४१.६, सोलापूर ४०.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com