Rain Forecast  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या कमाल किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मात्र गारठा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मात्र गारठा कायम आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे. आज (ता. ३१) रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात'ऑक्टोबर हीट'चा चटका कमी होत असतानाच, किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे ३६.४ तर रत्नागिरी येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

यातच राज्यात थंडीची चाहूल लागली असून, उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम आहे. सोमवारी (ता. ३०) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, छत्रपती संभाजीनगर येथे तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली आहे. किमान तापमानात हळूहळू घट होऊन राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्र आणि कोमोरीन भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होत असून, पावसाला पोषक हवामान झाले आहे.

आज (ता. ३१) सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (१५.२), जळगाव ३४.४ (११.०), कोल्हापूर ३२.२ (२१.६), महाबळेश्वर २७.५ (१७.१), नाशिक ३२.१ (१५.१), निफाड ३३.१ (१३.०), सांगली ३३.३ (२०.४), सातारा ३३.३ (१७.३), सोलापूर ३५.६ (१८.५), सांताक्रूझ ३६.४ (२२.८), डहाणू ३४.६ (२१.५), रत्नागिरी ३६.३ (२३.१),

छत्रपती संभाजीनगर ३३.६ (१३.६), नांदेड ३२.६ (१७.६), परभणी ३३.१ (१६.१), अकोला ३४.३ (१७.०), अमरावती ३३.६ (१६.३), बुलडाणा ३२.२ (१६.८), ब्रह्मपुरी ३४.८ (१८.४), चंद्रपूर ३१.६(१६.२), गडचिरोली ३०.२ (१६.४), गोंदिया ३१.७ (१६.३), नागपूर ३१.८ (१७.२), वर्धा ३१.९(१७.२), वाशीम ३४.४(१६.०) यवतमाळ ३४.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT