Vidarbha Rain Agrowon
हवामान

Vidarbha Rain : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Vidarbha Rain Forecast : विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावरील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरण्याचे संकेत आहेत. आज (ता. ४) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ निवळ्यानंतर वायव्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली निवळण्याचे संकेत आहेत.

मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, उदयपूर विदर्भातील कमी दाबाचे केंद्र ते रामागुंडम, कलिंगपट्टम ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय असून, उद्यापर्यंत (ता. ५) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे.

पावसाची हजेरी व ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.९ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली घसरला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आज (ता. ४) राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT