Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Rain Alert : उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत असल्याने राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता. ३) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान दिला आहे.

अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून, त्याची तीव्रता ओसरली आहे. पूर्व विदर्भ आणि तेलंगणा परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, रायसेन, चिंदवाडा, विदर्भातील तीव्र कमी दाबाचे केंद्र ते तेलंगणा, मच्छलीपट्टणम ते बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय असून, गुजरातपासून केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

पावसाच्या हजेरी व ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहे. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आज (ता. ३) पुणे आणि साताऱ्याचा घाटमाथा आणि अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाचा, तर उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह मध्यम ते जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

पुणे, सातारा, अमरावती.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Alert : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; पूर्व विदर्भात आजही वादळी पावसासाठी पोषक हवामान

Summer Okra Cultivation: उन्हाळ भेंडी पीक लागवडीत घट

Maharashtra Cabinet: वाशीम जिल्ह्याची मंत्रिपदाची आस कायम

Agriculture Drone Technology: सेन्सर्स, जीपीएस, जीआयएस प्रणालीयुक्त ड्रोन

Vijay Wadettiwar: सावकारी पाश! शेतकऱ्यानं किडनी विकली, शेतीही गेली, आरोपींना चौकात फाशी दिली पाहिजे- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT