Maharashtra Rain Alert : उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमीनीवर आल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमीनीवर आल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. २) विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट), तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रातील 'असना' चक्रीवादळ ओमानकडे सरकून गेले असून, त्याची तीव्रता ओसरणार आहे. दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड आणि उत्तर आंध्र प्रदेशमध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. ही प्रणाली आज विदर्भाकडे येताना हळूहळू निवळणार आहे. मॉन्सूनचा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीकडे सरकला असून, राजस्थानच्या गंगानगरपासून गुना, मालदा, तीव्र कमी दाबाचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain Alert : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

पावसाच्या हजेरी व ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहे. रविवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा आणि विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली.

Monsoon Rain
Sindhudurg Rain : समुद्रात वादळस्थिती कायम; सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

आज (ता. २) विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट), तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

अमरावती.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

जळगाव, छत्रपती संभाजीनगर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, सातारा, कोल्हापूर, जालना, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com