Rain Forecast  Agrowon
हवामान

Rain Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : मॉन्सून परतल्यानंतर थंडीची प्रतिक्षा असतानाच राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून परतल्यानंतर थंडीची प्रतिक्षा असतानाच राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. आज (ता. २८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजा, मेधगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वरील प्रणाली पासून मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात वादळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिला आहे.

आज (ता.२८) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला तरी मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

पावसाळी वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार झाल्याचे पहायला मिळत आहेत. कमाल तापमानात घट झाली असून, सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील वाशीम येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.३ (१९.७), धुळे २७.० (१५.०), जळगाव २८.६(१८.०), कोल्हापूर ३०.६ (२०.९), महाबळेश्वर २४.७ (१६.७), नाशिक २८.० (१८.४), निफाड २७.४ (१६.५), सांगली ३०.३ (-), सातारा ३०.८ (१९.९), सोलापूर ३३.३(२२.५), सांताक्रूझ ३२.२ (२२.०), डहाणू २७.९ (२१.९), रत्नागिरी ३५.० (२३.९),

छत्रपती संभाजीनगर २८.० (१७.८), नांदेड ३१.४ (-), परभणी ३०.८ (१७.६), अकोला ३१.९ (१७.२), अमरावती ३०.२ (१६.७), बुलढाणा ३०.२ (१६.७), ब्रह्मपूरी ३२.५ (१७.८), चंद्रपूर ३०.२(१७.०), गडचिरोली ३१.० (१५.६), गोंदिया २९.६ (१५.३), नागपूर २९.८(१८.२), वर्धा ३०.०(१८.५), वाशीम ३३.०(१४.८), यवतमाळ ३१.५ (१५.५).

उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

दक्षिण अंदमान समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारी (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढणार असून, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे. तर त्यानंतरच्या ४८ तासांमध्ये ही प्रणाली वायव्येकडे सरकताना चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

नगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT