Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update: विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने उद्यापासून राज्याच्या अनेक भागात उद्यापासून पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात आज सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. तर बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने उद्यापासून राज्याच्या अनेक भागात उद्यापासून पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला आहे.

राज कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच नगर, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

उद्या रायगड आणि पुणे तसेच अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 

शनिवारपासून विदर्भात मात्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर या तीन दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Today: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार; मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न शक्य : प्रा. कुलकर्णी

Swachh Wari Campaign: ‘स्वच्छ वारी’साठी संकल्प करूया : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

SCROLL FOR NEXT