Rain News  Agrowon
हवामान

Weather Forecast : कोकणात वाढणार पावसाचा जोर

Latest Rain News : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मॉन्सून दाखल झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. पावसाच्या हजेरीने उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मॉन्सून दाखल झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. पावसाच्या हजेरीने उन्हाचा चटका कमी होऊ लागला आहे.

आज (ता. २५) कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\

शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान २७ ते ३९ अंशाच्या दरम्यान आहे.

पावसाची हजेरी, ढगाळ हवामान, जोरदार वारे यामुळे कमाल तापमानाचा पारा वेगाने खाली घसरू लागला आहे. मॉन्सूनच्या आगमनने कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. उर्वरीत राज्यातही ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज (ता. २५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

या प्रणालीपासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजराच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, कर्नाटक ते केरळच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

आज (ता. २५) कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (आरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

वादळी पावसाचा इशारा :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT