Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

Rain Update : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १३) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे.

त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकार, ग्वालिअर, सिधी, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज (ता. १३) राज्यात पाऊस उघडीप देणार असून, पूर्व विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT