Marathwada Rain Agrowon
हवामान

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा इशारा

Rain Update : मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उघडीप देणाऱ्या पावसाला पोषक हवामान होत आहे. तुरळक ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यामुळे घामटा वाढला आहे. आज (ता. २१) मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, शिवपुरी, सिधी, जमशेदपूर, दिघा ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्रात आज (ता २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून, सोमवारपर्यंत (ता. २३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

पावसाच्या दडीने कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे ३५.६ अंश तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने घामटा निघत आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाश वादळी पावसाचे ढग गोळा होत आहे. आज (ता. २१) मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विजांसह पावसाची शक्यता :

जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT