Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: पाऊस दोन दिवस विश्रांती घेणार; विदर्भात सोमवारपासून पाऊस पुन्हा सुरु होण्याची शक्यता

Rain Update : राज्याच्या बहुतांशी भागात मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडीप दिसत आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात मागील दोन दिवसांपासून पावसाची उघडीप दिसत आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहील, तर सोमवारपासून विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज व्यक्त केला. तसेच शनिवारी आणि रविवारीही राज्यात पाऊश विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली. 

पुढील २ दिवस विश्रांती घेतल्यानंतर सोमवारपासून राज्यात पुन्हा पाऊस सुरु होणार आहे. हवामान विभागाने विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मंगळवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT