Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सुरु होणार; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. पण पावसाचा जोर कमी आहे. मात्र आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदरा पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Management : भातावरील कडाकरपा रोगाचे व्यवस्थापन

Silk production : पंजाब स्वत:चा रेशीम ब्रँड बाजारात आणणार; रेशीम दिनानिमित्त लाँच केला 'लोगो'

Fish Conservation : तलाव, मत्स्य संवर्धनासाठी महिला गटांचा पुढाकार

Bird Conservation : पर्यावरण, धनेश पक्षी संवर्धनाचा ‘संकल्प’

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

SCROLL FOR NEXT