Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update Maharashtra : विदर्भात पावसाच्या सरींची शक्यता ;  राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार 

Weather Update : राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहेत. देशातील विविध भागात पुढील दोन दिवस पावसाला पोषक स्थिती आहे.

Dhananjay Sanap

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळ निवळलं आहे. तरीही राज्यात ढगाळ हवामान आहे. तर राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहेत. देशातील विविध भागात पुढील दोन दिवस पावसाला पोषक स्थिती आहे.

तर विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह किमान आणि कमाल तापमान चढ-उताराची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची भुरभुर हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

देशाच्या दक्षिण भागात पुढील चार ते पाच दिवस पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. तर ८ ते १० तारखेच्या दरम्यान केरळमध्ये तसेच ८ आणि ९ तारखेला तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

आज सकाळपासून काही भागात धुक्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. तर गुरुवारी विविध भागात हलक्या सरीने हजेरी लावली होती. हवामान विभागाने कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goat Farming: शेडमध्येच जातिवंत पैदाशीवर भर

Animal Species Breeding: समजून घ्या पशू प्रजातीमधील पैदास तंत्र

Innovation in Education: अज्ञानाच्या अंधारातील चाचपड

Agriculture Education: खेळखंडोबा कृषी शिक्षणाचा!

Rajuri Cooperative Dairy: राजुरीतील गणेश दूध संस्थेच्या गवळ्यांना १० टक्के लाभांश वाटप

SCROLL FOR NEXT