पीक विम्यावरून राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा १ रुपये, ६ रुपये पीक विम्याचे चेक शेतकऱ्यांना आलेतशेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल, सरकारवर हल्लाबोल.Uddhav Thackeray on Crop Insurance issue: पीक विम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. १ रुपयाचा, ६ रुपयाचा पीक विमा असे चेक शेतकऱ्यांना आले आहेत. ही तर मदतीची थट्टा झाली आहे. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत; त्यावर सरकार कारवाई करणार आहे का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते गुरुवारी (दि.११ डिसेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते. .सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यात विदर्भाला नेमकं काय दिलं गेले? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या रुपाने आपत्ती कोसळली. हाहाकार उडाला. पीकं सडून गेली. शेतजमिनीच वाहून गेली. मुख्यमंत्र्यांनी भले मोठे पॅकेज असे नाव देऊन रक्कम घोषित केली. पॅकेजचे पुढे काय झाले. त्या पॅकेजचे ठिबक सिंचन झाले हे कळायला मार्ग नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला..Ativrushti Madat: अतिवृष्टी आणि पुरावरून विधानसभेत काय घडलं?.केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राकडून मदतीचा प्रस्तावच आला नसल्याचे अगोदर सांगितले. त्यानंतर सरकारकडन घाईघाईने शेवटच्या टप्प्यात एक प्रस्ताव पाठवला गेला. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की नेमका काय प्रस्ताव गेला? हा किती रकमेचा प्रस्ताव आहे? त्यातील कोणाला मदत होणार आहे?. जर तुम्ही प्रस्ताव पाठवला गेला असेल ते पटलावरती ठेवला पाहिजे. हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे..Ativrushti Madat: खरडून गेलेल्या जमिनीसाठी ९० कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर; शासन निर्णय जारी.राज्य सरकार नेमकी केंद्राकडून कशी मदत आणणार आहे?. कारण त्यांचे डबल इंजिन सरकार आहे. सरकारची मदत ही ई-केवायसी, खाते जमा करण्यात अडकली आहेत. सरकारकडून जनतेला उत्तरे मिळाली पाहिजेत. व्यथा मांडल्या जात आहे. पण नुसता वेळ मारुन नेला जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला..'विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकार का घाबरतंय?'विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, पहिल्या अधिवेशनातच आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. यासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिले आहे. अद्याप काही उत्तर मिळाले नाही. उपमुख्यमंत्री हे संवैधानिक नसलेले पद आहे. असे असताना सरकार एक नव्हे तर दोन पदे निर्माण करु शकते. तर ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरतंय? असा सवाल त्यांनी केला. सरकार मजबूत असताना जर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक रद्द केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. .शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष नाही. सरकार प्रचारात गुंतले आहे. बॅगा भरभरून आनंदाचा शिधा जातोय, अशी टीकाही त्यांनी केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.