Parbhani-Hingoli News: राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित हे ॲप शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट डिजिटल सहायक ठरत आहे. परंतु महाविस्तार ॲप डाऊलोड करून नोंदणी करण्याबाबत शेतकरी तुर्त उदासीन असल्याचे चित्र आहे..परभणी जिल्ह्यात ८ हजार ६२९ आणि हिंगोली जिल्ह्यतील ७ हजार १७१ मिळून एकूण १५ हजार ४०० शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी यासाठी कृषी विभागाकडून जागरुकता केली जात आहे..राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने कृषी विभागातर्फे विकसित करण्यात आलेले महाविस्तार एआय ॲप मोबाइलवर गुगल प्लेस्टोअरमधून किंवा https://play.google.com/store/apps/details0id=in.gov.mahapocra.mahavistaarai हे ॲप डाऊनलोड करता येते..महाविस्तार ॲप शेती संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविते. हवामान अंदाज व बाजार भावावर आधारित तत्काळ निर्णय घेणे शक्य होते. .Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं? .पिकांसाठी योग्य खत नियोजन, कीड-रोग नियंत्रणाच्या उपाययोजना वेळेवर करणे शक्य होते. शासकीय योजनांविषयी माहिती मिळणार आहे. शेतीसंबंधी समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. .MahaVistar App: महाविस्तार अॅपवरून कोणती माहिती शेतकऱ्यांना मिळणार?.यातून शेती व्यवसाय अधिक सुलभ व परिणामकारक बनेल. या ॲपमधील चॅट बॉटद्वारे शेतकऱ्यांना मराठी भाषेत प्रश्न विचारून तत्काळ शासकीय स्रोतांकडून खात्रीलायक उत्तरे प्राप्त होतात. महाविस्तार ॲप डाउनलोड करून आपला मोबाइल क्रमांक वापरून सहज नोंदणी करू शकतात. .नोंदणी झाल्यानंतर ॲपमध्ये उपलब्ध सर्व सुविधा पूर्णपणे मोफत वापरता येतात. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना लीडर बोर्डवर स्थान मिळेल. त्यातून शेतकऱ्यांमध्ये ज्ञानवर्धनाबरोबरच स्पर्धात्मकता निर्माण होईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सर्व सभासदांकडून ॲप डाउनलोड करावे आणि नियमितपणे या ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण (परभणी), राजेंद्र कदम (हिंगोली) यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.