Amravati News: अचलपुरातील फिनले मिल बंद असल्याने येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिल सुरू करण्यासाठी कामगार व विविध संघटनांकडून लोकप्रतिनिधी, नेते व संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठका झाल्या, निवेदने दिली आणि आंदोलने केली परंतु त्यांचा काही एक उपयोग झाला नाही. .कामगारांनी दिलेला प्रदीर्घ लढा व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणजे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची फिनले मिल अचलपुरात उभी झाली. फक्त उभी झाली नाही तर त्यापासून मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती होऊ लागली. मिल नफ्यातही होती. मात्र कोरोनाकाळात पुरेसा कच्चामाल नसल्याचे कारण पुढे करीत फिनले मिल बंद करण्यात आली. नफ्यात असलेली मिल लवकरच सुरू होईल, अशी आशा कामगारांना होती. मात्र मिल बंद असल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. काही कामगारांनी मिळेल ते काम सुरू केले, तर काहींचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले असल्याचे विदारक चित्र आहे. काम गेल्याने नैराश्यातून जवळपास पाच-सहा कामगारांनी आपली जीवनयात्रा संपविली, तर दहापेक्षा अधिक कामगारांचा आर्थिक विवंचनेतून मृत्यू झाला असल्याचे कामगार सांगतात..Cotton Processing Industry : ब्राझील देणार कापसावरील प्रक्रियेला प्रोत्साहन.एप्रिल २०२१ पासून बंद झालेली मिल सध्याही बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून मिल सुरू करण्यासाठी आंदोलने केली तसेच निवेदने दिलीत. मात्र मिल सुरू झाली नाही. सध्या अर्धे वेतन मागील वर्षभरापासून तर थकीत वेतन मागील दोन वर्षांपासून मिळाले नाही. शासन-प्रशासनाने कामगाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-दिनेश उघडे उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ.मिल सुरू करावी व थकीत वेतन द्यावे, याकरिता दिवाळीपूर्वी आम्ही मिलच्या दोनशे फूट उंच चिमणीवर चढून ऊन, वारा, पावसात चिमणी आंदोलन केले. आम्हाला थकीत वेतन मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अजूनही ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. सरकार व एनटीसी प्रशासन आमची परीक्षा घेत आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.-विवेश उघडे, कामगार.Dairy Processing Industry: ग्राहकांनीच मोठा केलेला कदम यांचा ब्रॅंड.फिनले मिल सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांसोबत दोन वेळा पत्रव्यवहार झाला. त्यांची भेट घेतली, मात्र मिल सुरू करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही व त्यांनी स्पष्ट सांगितले की २७ मिल बंद आहेत. जर राज्य शासन मिल सुरू करीत असेल तर आमची हरकत नाही. आता सरकारने याकडे गंभीरतेने बघणे आवश्यक आहे. मिल सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत.-बळवंत वानखडे, खासदार.फिनले मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. या अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार आहे.-प्रवीण तायडे, आमदार.मिल सुरू असताना एकाही कामगारांचा मृत्यू झाला नाही. मिल बंद झाल्यावर जवळपास १६ कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोणी आत्महत्या केली, तर कोणाचा नैराश्यातून मृत्यू झाला. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असतानाही मिल सुरू करण्यासाठी एवढा वेळ कसा लागतो?-राजा ठाकूर , उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.