Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : तीन दिवस पावसाची शक्यता; माॅन्सूने देशाच्या आणखी काही भागातून माघार घेतली

Rain Forecast : पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आज देशाच्या आणखी काही भागातून माघार घेतली. तर राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस पडत आहे. तसेच पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

माॅन्सूनने आज देशातील काही भागातून माघार घेतली. माॅन्सून संपूर्ण उत्तर प्रदेशातून माघारी फिरला. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड राज्याच्या काही भागातूनही माॅन्सूनने माघार घेतली.

माॅन्सूनच्या पतीची सिमा आज दरभंगा, हझारीबाग, पेंद्रा रोड, नरसिंहपूर, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती. तर माॅन्सून पुढील दोन दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या उरलेल्या भागातून माघारी फिरेल. तर महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागातून माघारी फिरेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. रविवारी कोकण, मध्यम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भात सोमवारी पावसाची उघडीप पाहण्याचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT