Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : शनिवारी पावसाचा जोर वाढणार; उद्यापासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर आजही वाढला नाही. त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

IMD Rain Alert : राज्याच्या काही भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज होता. पण ठिकठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पावसाचा जोर आजही वाढला नाही. त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज दिला.

हवामान विभागाने राज्यात उद्यापासून पाऊस वाढेल, असा अंदाज जाहीर केला. उद्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. उद्या विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

शनिवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शनिवारी विर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच खानदेश जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; केंद्राचे पथक लवकरच महाराष्ट्रात : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Urea Treatment: वाळलेल्या पिकांपासून घरच्या घरी बनवा जनावरांसाठी पौष्टिक चारा

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार

Rain Update: राज्यातील ५ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT