E Peek Pahani : पीक नोंदणी ‘ऑफलाइन’ करा; सर्व्हर ‘डाउन’च

Kharif Crop Registration : नैसर्गिक आपत्ती आणि पीकविमा भरपाईत महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक नोंदणीची गती जिल्ह्यात तुलनेने कमीच आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Solapur News : नैसर्गिक आपत्ती आणि पीकविमा भरपाईत महत्त्वाच्या असणाऱ्या ई-पीक नोंदणीची गती जिल्ह्यात तुलनेने कमीच आहे. सर्व्हरच्या वारंवार संथगतीमुळे ई-पीक पाहणीच्या अॅपला पुरेशाप्रमाणात त्याची जोड मिळत नसल्याने पीक नोंदणीत अडथळे येत आहेत. सर्व्हर चालत नाही. शेतकरी वारंवार प्रयत्न करून कंटाळून गेले आहेत. जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्यापही पीक नोंदणीपासून वंचित असून, ‘सर्व्हर’सोबतच ही नोंदणी स्थिती जिल्ह्यात ‘डाउन’ असल्याची स्थिती आहे.

सोलापूर जिल्हा खरिपाचा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. सुमारे तीन लाख हेक्टरवर या हंगामात आता पिके होत आहेत. या परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती आणि पीकविम्यासाठी ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. गेल्या महिन्यात या नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

E Peek Pahani
E Peek Pahani : खानदेशात ई-पीकपाहणीचा फज्जा

शिवाय संबंधित अॅपही व्यवस्थित चालले. त्यामुळे पीक नोंदीने गती घेतली. पण गेल्या पंधरवड्यापासून अनेक भागांत ‘सर्व्हर डाउन’चा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, शेतात जाऊन संबंधित अॅपवर नोंदणी करताना ऐनवेळी पुन्हा ही समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत.

E Peek Pahani
E Peek Pahani : ‘महसूल-कृषी’च्या ई-पीक पाहणी अहवालात तफावत

महसूल विभाग सुस्त

‘सर्व्हर’चा पुरेसा जोड या अॅपला मिळत नाही. पीक नोंदणीचे हे काम संपूर्णपणे महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या कामाविषयी तलाठी किंवा मंडलाधिकाऱ्यांकडे शेतकरी तक्रार करतात. तेव्हा पुन्हा- पुन्हा प्रयत्न करा, होईल. एवढेच उत्तर मिळते. पण प्रत्यक्षात कर्मचारी शेतकऱ्यांना त्यासाठी मदत करत नाहीत, असे चित्र आहे.

३० ते ४० टक्के शेतकरी प्रतीक्षेत

जिल्ह्यात ई-पीक नोंदणीसाठी सुमारे १ लाख ७७ हजार ४७१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख १८ हजार ९११ शेतकऱ्यांनी ही ई-पीक नोंदणी पूर्ण केलेली आहे. अद्यापही किमान ३० ते ४० टक्के शेतकरी या नोंदणीपासून दूर आहेत.

मी गेल्या आठवड्यातच नोंद केली. पण त्या आधी पंधरा दिवस नोंदणीसाठी प्रयत्न करीत होतो. पण हा अडथळा आल्यानंतर कोणाला विचारायचे, हा प्रश्‍न होता. तलाठ्याला विचारले, तर प्रयत्न करा, असे सांगत होते. पण कोणीही त्याबाबत मदत करत नव्हते. हे काम ऑफलाइन करावे किंवा त्यासंबंधी पाठपुरावा करणारे कर्मचारी तरी हवेत. - अप्पा कोरके,
शेतकरी, गुळवंची, ता. उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com