Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Weather Alert: राज्यात मॉन्सून पुन्हा जोर धरण्यासाठी पोषक वातावरण झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update Today : राज्यात मॉन्सून पुन्हा जोर धरण्यासाठी पोषक वातावरण झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उर्वरित विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्‍चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. राजस्थानच्या बिकानेर, अलवार, ग्वालेर, सिधी, दाल्टोनगंज, शांती निकेतन ते मिझोरामपर्यंत मॉन्सूनचा आस सक्रिय आहे. पश्‍चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत कायम आहे.

उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, हरियानामध्ये ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तळ कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहे.

आज (ता. १५) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, नागपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT