Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

Rain Update : सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात सध्या पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. उद्या मराठवाड्यातील काही भागात पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर उद्या मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मंगळवारी विदर्भातही पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT