Pune News : कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने चांगलाच जोर लावून धरला आहे. रत्नागिरीतील कोंडगाव मंडलात शनिवारी (ता. २९) सर्वाधिक १३९.३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून धरणांतील पाणीपातळी चांगलीच वाढू लागली आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्ह्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांना दिलासा मिळत आहे.
कोकणात मागील काही दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पालघरमधील तलवड मंडलात ९९.० मिलिमीटर,तर मनवर येथे ९२ मिमी पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, बेलापूर मंडलात ७४.८ मिलिमीटर, तर अप्पर कल्याण येथे ७४.८ मिमी पाऊस पडला.
खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पाऊस नसल्याने कापूस, सोयाबीन पिके पाण्यावर आली आहेत. काही ठिकाणी पिके सुकत आहेत. त्यामुळे या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी भोकर मंडलात ५२.३, बामणोद ७१.५, अमळनेर ६७, मारवड ५४.५, सोनवद ६५.८ आणि नांदगाव येथे ५६.३ मिलिमीटर पाऊस पडला.
पुणे जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला.
मराठवाड्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसत आहे.
१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेली ठिकाणे : स्रोत - कृषी विभाग
वेळवी १२०.८, दापोली १२०.८, देवळे ११५.५, मोराबी १०९.५, कोलाड १०६.८, मेढा १०६.८, ओणी ११२.८, भांबेड १०६.५, पुनस १०१.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.