Weather Update : कोकणात पावसाचा जोर; राज्यात प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकणात पावसाने जोर धरला आहे. कोकणात काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकणात पावसाने जोर धरला आहे. कोकणात काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडत असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरीतील दापोली येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीसह, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असली तरी राज्यात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या अंतर्गत भागात अद्यापही जोरदार पावसासाठी वाट पाहावी लागत आहे.

Weather Update
Konkan Rain: आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यापासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होत असल्याने राज्यात पावसाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे. आज (ता. २८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Weather Update
Monsoon Rain : बहुतांशी भागाला पावसाचा येलो अलर्ट; कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

मॉन्सूनने गुजरात व्यापला

मॉन्सून मजल-दरमजल करत उत्तरेकडे चाल करत आहेत. गुरुवारी (ता. २७) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरातसह छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख बहुतांश भाग, बिहार, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांसह पंजाब राज्याच्या काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिमी) :

कोकण : मुंबई शहर : कुलाबा ४७. रायगड : खालापूर ४१, महाड ८६, माथेरान ५२, म्हसळा ६०, मुरूड ८०, पेण ५३, पोलादपूर ७१, रोहा १३७, श्रीवर्धन ६१, सुधागडपाली १०८, तळा ४७. रत्नागिरी : चिपळूण ६८, दापोली १७०, गुहागर ७०, हर्णे ६८, खेड ७६, लांजा ५०, मंडणगड १२५, राजापूर ८२, रत्नागिरी १४५, संगमेश्‍वर ७०, सावर्डे १०५, वाकवली ४६. सिंधुदुर्ग : आवळेगाव ११२, कणकवली ९१, कुडाळ ६५, मालवण ६४, मुलदे (कृषी) ७१, रामेश्‍वर ७३, सावंतवाडी ६५, वैभववाडी ५२, वेंगुर्ला १०२.

मध्य महाराष्ट्र : नगर : अकोले १०६, शेवगाव ३५. जळगाव : रावेर ४५, यावल ६०. कोल्हापूर : गगनबावडा ६७, राधानगरी ४१. पुणे : लोणावळा कृषी ३०, पौड ३४, वेल्हे ५०.

मराठवाडा : लातूर : शिरूर अनंतपाळ २०.

विदर्भ : अमरावती : धामणगाव रेल्वे ४३. गडचिरोली : सिरोंचा २५. नागपूर : काटोल २५, नरखेड ३९.

वर्धा : देवळी ३८, हिंगणघाट २७, वर्धा २०. यवतमाळ : बाभूळगाव २४, कळंब ४२, राळेगाव २३.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :

दापोली १७०, रत्नागिरी १४५, मंडणगड १२५, सावर्डे १०५ (जि. रत्नागिरी), रोहा १३७, सुधागडपाली १०८ (जि. रायगड), आवळेगाव ११२, वेंगुर्ला १०२ (जि. सिंधुदुर्ग), अकोले १०६ (जि. नगर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com